
सावंतवाडी : कोलगांव येथील सुप्रसिद्ध वैद्य विठू कृष्णा राऊळ (वय ८५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते आयुर्वेदिक औषधे देत. अनेकांच्या आजारांवर त्यांनी यशस्वी उपचार केले होते. संगितविशारद कृष्णा राऊळ यांचे ते वडील तर विशारद सर्वेश राऊळ यांचे ते आजोबा होत. त्यांच्या पश्चात तीन मुलगे महादेव राऊळ, कृष्णा राऊळ, रामचंद्र राऊळ, दोन मुली, सुना, नातवडे, जावई असा मोठा परिवार आहे.