स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये वैद्यादिन उत्साहात...!

Edited by: विनायाक गावस
Published on: July 02, 2023 11:01 AM
views 110  views

सावंतवाडी : लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्ती देखील शारिरिक व मानसिक दृष्ट्या काही अडचणी उद्भवल्यास वैद्यांच्या सल्ल्याने त्यांच्या योग्य मार्गदर्शनानेच त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतात. आणि वैद्य देखील आपल्या रुग्णांची तितकीच काळजी घेऊन त्यांना रोगमुक्त करतात. आणि अशा या वैद्यांचे महत्त्व सर्व विद्यार्थ्यांना पटवून देण्याकरिता स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये वैद्यदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात इयत्ता १ ली ते ५ वी च्या विद्यार्थ्यानी सहभाग घेतला व वेगवेगळ्या उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यांची भूमिका पोषाखासहीत सादर करून त्यांचे कार्य व महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी डेंटिस्ट म्हणजेच दातांचा उपचार करणारा वैद्य, नेफ्रोलॉजिस्ट म्हणजेच किडनीवर उपचार करणारा वैद्य, आॅफथॅलमोलॉजिस्ट म्हणजेच डोळ्यांचा उपचार करणारा वैद्य, अॉर्थोपेडिक म्हणजे हाडांचा वैद्य तसेच कार्डिअॉलाॅजिस्ट म्हणजे हृदयविकार तज्ञ या सर्व वैद्यांची भूमिका पार पाडताना विद्यार्थ्यांनी या सर्व वैद्यांचे कार्य व त्यांच्याविषयी माहिती दिली. सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील सह. शिक्षिका सौ. जागृती प्रभू तेंडोलकर व सौ. कविता साबलपारा यांनी मार्गदर्शन केले. 

तसेच, या कार्यक्रमाच्या माध्यमाने कोणतीही शारिरिक व मानसिक समस्या उद्भवल्यास वैद्यांच्या योग्य सल्ल्याने स्वतःची  मासिक व वार्षिक  तपासणी करणे किती महत्त्वाचे आहे, व आपल्या आरोग्याची काळजी घेणेही किती महत्त्वाचे आहे हे सर्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. त्याचप्रमाणे, सकस आहार व व्यायाम नियमित करणेही आरोग्याच्या दृष्टीने हितकारक ठरते हे विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत व शाळेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 

अशाप्रकारे, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये वैद्यांचे महत्त्व पटवून देणारा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचा शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आस्वाद घेतला व आपल्या जीवनात वैद्यांचे किती महत्त्व आहे हे जाणून घेतले.