
वैभववाडी : समग्र शिक्षा विभाग व राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. येथील ग्रामीण रुग्णालयात हे शिबीर पार पडले. यामध्ये ० ते १८ वर्ष वयोगटातील २० विद्यार्थांची नेत्र तपासणी करण्यात आली. नेत्ररोग तज्ञ देवयानी देसाई यांनी या सर्व विद्यार्थ्यांची तपासणी केली. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अर्जुन नरोटे, सचिन महींद्रे, दत्तात्रय तापेकर, योगेश पांढरे, वैदही पिळणकर आदी उपस्थित होते.