
वैभववाडी : २६/११ला मुंबईवर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस व सैनिकांना आज वैभववाडीत श्रद्धांजली वाहण्यात आली.एडगाव येथील शहीद विजय साळसकर यांच्या स्मारकात आज (ता .२६) अर्जुन रावराणे विद्यालयातील विद्यार्थी व पोलीस प्रशासनाने मानवंदना दिली.
सन २००८मध्ये २६ नोव्हेंबरला मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला.या हल्यात अनेक नागरिक, पोलीस अधिकारी व जवान मारले गेले होते.त्यात वैभववाडी तालुक्यातील पोलीस खात्यातील अधिकारी विजय साळसकर हे शहीद झाले होते.या सर्वांना आज श्रद्धांजली वाहण्यात आली.एडगाव येथील शहीद विजय साळसकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली.सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल व वैभववाडी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी साळसकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.तसेच अर्जुन रावराणे विद्यालयातील विद्यार्थी व पोलीसांनी साळसकर यांना मानवंदना दिली.भारत माता की जय,शहीद विजय साळसकर अमर रहे,वंदे मातरम् आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
यावेळी अर्जुन रावराणे विद्यालयाचे मुख्याध्यापक भास्कर नारकर,शिक्षक एस बि शिंदे,पी बी पवार,व्हि एम मरळकर,पी जी सावंत,पी एम पाटील, नंदकुमार प्रभू,मंदार चोरगे,योगेश चव्हाण,पी पी सावंत, पोलीस संदीप राठोड, जितेंद्र कोलते,हरिष जायभाय,अजय बिल्पे यासह पोलीस कर्मचारी , शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.