मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त वैभववाडीत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

*दि.७ ऑगस्ट २०२४ रोजी आनंदीबाई रावराणे महाविद्यालय येथे सकाळी ९.३० वाजता शिबिरास प्रारंभ* *वैभववाडी पंचक्रोशीतील रक्तदात्यांनी शिबीरात रक्तदान करून सहभाग नोंदवावा - सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या वतीने आवाहन
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: August 04, 2024 05:18 AM
views 221  views

वैभववाडी :-हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे -सडुरे यांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमित्त  आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी, पोलिस ठाणे वैभववाडी , राजेश मो. पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

           आनंदीबाई रावराणे महाविद्यालय येथे बुधवार दि.७ ऑगस्ट २०२४ रोजी  सकाळी ०९.०० वाजता प्रतिमा पूजन व मेजर कौस्तुभ रावराणे यांना अभिवादन करुन रक्तदान शिबीरास ९.३० वाजता प्रारंभ होणार आहे.

          तरी वैभववाडी पंचक्रोशीतील रक्तदात्यांनी या भव्य रक्तदान शिबीरात आपले रक्तदान करत या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.