जि. प. व पंचायत समितीच्या निवडणुकीची उद्या मतमोजणी

सकाळी १० वाजल्यापासून प्रारंभ
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 08, 2026 19:30 PM
views 24  views

वैभववाडी : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्य पदाकरीता झालेल्या निवडणुकीची सोमवारी तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. सकाळी १० वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. सुरवातीला टपाली मतदानाची मोजणी होणार असून त्यानंतर बॅलेट मशीनच्या मतांची मोजणी केली जाणार आहे. ही मतमोजणी सहा टेबल केली जाणार आहे. एकाच वेळी सर्व गणांची मोजणी होणार आहे. काही मतदारसंघात ११ तर काही ठिकाणी ९ फे-या होणार आहेत.