मालवणी करंडकच्या निमित्ताने "फूड फेस्टिवल"च आयोजन

स्वागत समितीच्या अध्यक्षपदी बबन साळगावकर
Edited by: विनायाक गांवस
Published on: February 08, 2026 20:08 PM
views 29  views

सावंतवाडी : ओंकार कला मंच व पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मालवणी करंडक महोत्सवाच्या निमित्त २७, २८ फेब्रुवारी व १ मार्च या तीन दिवसाच्या कालावधीत "फुड फेस्टिवल" चे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या महोत्सवाच्या स्वागत समिती अध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. या निमित्ताने समिती सदस्यांची बैठक नुकतीच झाली. यावेळी समितीचे अध्यक्ष अमोल टेंबकर,उपाध्यक्ष ॲड. ऋजूल पाटणकर, उपाध्यक्ष दादा मडकईकर, सचिव भुवन नाईक, सहसचिव सचिन मोरजकर, खजिनदार श्रेयस मुंज, सदस्य निरंजन सावंत, आनंद काष्टे, निखिल माळकर, सावली पाटकर, हेमंत पांगम, साहिल सावंत, भालचंद्र लांबर, मृणाल पावसकर, प्रणव तारी आदी उपस्थित होते.

या ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या फूड फेस्टिवलमध्ये खवय्यांसाठी वेगवेगळे स्टॉल लावण्याचा निर्णय घेण्यात आला. यात कोकणी पदार्थांसह मालवणी चायनीज व अन्य पदार्थाचे स्टॉल या ठिकाणी उभारले जाणार आहेत. या करंडक महोत्सवात आपल्या एकांकीका सादर करण्यासाठी अनेक संघानी संपर्क केला आहे. लवकरच त्यांची घोषणा करण्यात येणार असून या महोत्सवाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात आपले यश संपादन करणाऱ्या पाच कलाकारांचा पुरस्कार देवून सन्मान करण्यात येणार आहे. त्यांची नावे लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. या महोत्सव समितीच्या स्वागत समितीच्या अध्यक्षपदी श्री. साळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून या महोत्सवाला विविध मान्यवरांना आमंत्रित करण्यात येणार आहे. दरम्यान, या ठिकाणी स्टॉल घेण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यावसायिकांनी अधिक माहितीसाठी 9922316777 या नंबर वर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आले आहे.