दुचाकीला धडक देऊन पलायन

Edited by: विनायाक गांवस
Published on: February 08, 2026 20:02 PM
views 34  views

सावंतवाडी : कारागृहाजवळ एका पर्यटकाच्या कारने दुचाकीला धडक देऊन घटनास्थळावरून पलायन केल्याची घटना आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीवरील तिघेजण जखमी झाले आहेत. दरम्यान पळून गेलेली कार गवळी तिठा येथे पकडण्यात आली. कारचालकाने दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर न थांबता तेथून पळ काढला. अपघातानंतर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जखमींना तातडीने सामाजिक कार्यकर्ते साई राऊळ यांनी पुढाकार घेत त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरू असून अधिक तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.