
वैभववाडी : मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात तालुक्यातील प्राथमिक शाळा गटात पी.एम. श्री. दत्त विद्यामंदिर, वैभववाडी या शाळेने तालुका व जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे.पुनर्मूल्यांकनातही शाळेने आपले प्रथम क्रमांकाचे स्थान कायम राखले आहे.प्रशालेच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभिमान ३ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात आले होते. याद्वारे शाळेच्या पायाभूत सुविधा, शैक्षणिक व सहशालेय उपक्रम, विद्यार्थी सुरक्षितता, स्वच्छता, पर्यावरणपूरक उपक्रम आदी घटकांचे मूल्यांकन करण्यात आले.या सर्व निकषात ही शाळा सरस ठरली.त्यामधील
शालेय परिसरातील वृक्षलागवड व प्रत्येक वृक्षाची माहिती देणारे क्यूआर कोड हे विशेष आकर्षण ठरले. या यशासाठी गटशिक्षणाधिकारी अशोक वडर, गटसमन्वयक विजय केळकर, केंद्रप्रमुख रामचंद्र जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक दिनकर केळकर व सर्व शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांच्या सहकार्याने हे यश संपादन झाले असून, सर्व स्तरांतून शाळेचे शिक्षक,शाळा व्यवस्थापन समितीचे अभिनंदन होत आहे.










