
वैभववाडी : एडगाव तांबेवाडी येथील दत्ताराम तानू तांबे (वय ७८)यांचे अल्पशा आजाराने शनिवारी (ता.१७जाने) निधन झाले.काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्याने कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे. तांबे हे शहरातील एका खाजगी रुग्णालयात एक्सरे तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होते.










