सुशांत नाईकांनी केलं उत्तम लोके यांचं कौतुक

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 18, 2026 18:00 PM
views 169  views

कणकवली :  युवासेना तालुका चषक दारिस्ते कणकवलीचे उद्घाटन युवासेना जिल्हाप्रमुख तथा कणकवली उपनगराध्यक्ष सुशांत नाईक व युवासेना तालुका कणकवली प्रमुख तथा एसटी कामगारसेना तालुकाप्रमुख श्री. उत्तम लोके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले.

युवा सेनेचे काम जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी शिवसैनिकांची आहे व अशा स्पर्धांच्या माध्यमातून जनतेपर्यंत आपले काम सहजपणे पोहोचविले जात असून तरुणांना एकवटण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या आहेत. असे प्रतिपादन युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली याप्रसंगी शिवसेना शाखाप्रमुख अविनाश गावकर, युवासेना शाखाप्रमुख विजय गावकर लवू पवार, श्रीराम गुरव, दारिस्ते गावचे मानकरी बाळू गावकर, संदीप गावकर, ओमकार गावकर, आर्यन गावकर, प्रतीक गावकर, सहदेव गावकर, आर्यन गावकर, हरेश तांबे, रितेश ठाकूर, अमित सावंत, बापू तावडे, प्रथमेश सावंत, शिवप्रसाद गावकर, पंढरी तांबे, श्रीराम गुरव, गणेश गुरव, सुरज गुरव, वैभव गुरव, वैभव मेस्त्री, सूरज देवळी, प्रतीक गावकर आदी शिवसैनिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.