
वैभववाडी : तालुक्यात संविधान दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ, माता रमाबाई महिला मंडळ, अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल तसेच कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने याच आयोजन करण्यात आले होते.तालुक्यातील नागरिक व विद्यार्थ्यांच्या उपस्थित हा दिन साजरा झाला.
२६नोव्हेंबर हा संविधान दिन दरवर्षी तालुक्यात साजरा केला जातो.याही वर्षी मोठ्या उत्साहात हा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तालुका बौद्ध सेवा संघाचे अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भूषविले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंतर संविधानाच्या प्रतिकृतीसह डॉ. आंबेडकर यांच्या छायाचित्रास पुष्पहार अर्पण करण्यात आला. संतोष कदम यांनी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन घडवून आणत उपस्थितांना संविधान मूल्यांची जाणीव करून दिली.यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे,माजी महीला व बालकल्याण सभापती शारदा कांबळे, संचालक शरद नारकर, विजय रावराणे, उपाध्यक्ष संतोष कदम, सरचिटणीस रविंद्र पवार, सहसचिव शरद कांबळे, सुरेंद्र यादव, महेंद्र यादव, अमर कदम, माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा व माजी समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, सचिव रुचिता कदम आदी मान्यवर उपस्थित होते. अर्जुन रावराणे विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.संविधान मूल्यांप्रती निष्ठा व जागरूकता वाढवणारा हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी वातावरणात पार पडला.










