एडगाव पाष्टेवाडी येथे घरावर पडले झाड

मायलेकी सुदैवाने बचावल्या
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 24, 2025 11:26 AM
views 222  views

वैभववाडी : एडगांव पाष्टेवाडी श्रीमती प्रमिला भिकाजी पाष्टे यांच्या घरावर चिंचेचा झाड पडून मोठं नुकसान झाले.सुदैवाने  यातून मायलेकी बचावल्या.हा प्रकार सोमवारी मध्यरात्री १.३०वा घडला. एडगाव येथे प्रमिला पाष्टे यांचे शासनाच्या घरकुल योजनेतील घर आहे.मध्यरात्री तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसासह झालेल्या वादळात त्यांच्या घराशेजारी असणार भलंमोठं चिंचेचं झाड उन्मळून घरांवर पडले.यात घराचं संपूर्ण छप्पर कोसळले आहे.या दुर्घटनेवेळी श्रीमती पाष्टे व त्यांची मुलगी अश्विनी या घरातच झोपलेल्या होत्या.मात्र सुदैवाने त्या या अपघातातून बचावल्या.