मांगवलीत एसटी बस गटारात कलंडली

सर्व प्रवासी सुखरूप; एसटीचे किरकोळ नुकसान
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 23, 2025 19:19 PM
views 17  views

वैभववाडी : खारेपाटण -गगनबावडा मार्गावर मांगवली पुनवर्सन गावठण येथे एसटी बस गटारात कलंडली.समोरून येणाऱ्या एसटीला बाजू देत असताना दुपारी ३.३वाजता हा अपघात झाला.गाडीतील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.अपघातात गाडीचे किरकोळ नुकसान झाले.

खारेपाटण -गगनबावडा मार्गावरून दुपारी साडेतीन वाजता मौदे- कणकवली ही उंबर्डेच्या दिशेने एसटी बस येत होती.याच दरम्यान कणकवली -जांभवडे ही बस भुईबावड्याच्या दिशेने जात होती.या गाड्या एकमेकांना बाजू देत असताना, कणकवली -मौदे ही बस गटारात कल़डली.यावेळी गाडीत पाच ते सहा प्रवासी होते.या सर्वांना चालकाच्या बाजुंच्या दरवाजाने बाहेर काढण्यात आले.गाडीतील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.अपघातात गाडीच किरकोळ नुकसान झाले.यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी जेसीबीच्या साहाय्याने बस बाहेर काढून मार्गस्थ केली.