पालकमंत्री नितेश राणेंच्या दिर्घायुष्यासाठी नगरसेवक - ठेकेदार संघटनेकडून अभिषेक

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 23, 2025 13:34 PM
views 56  views

वैभववाडी : महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेंचा आज वाढदिवस आहे.त्यांच्या या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत.वैभववाडी येथील नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक व ठेकेदार संघटनेकडून   मंत्री राणे यांच्या दिर्घायुष्यासाठी शहरातील दत्त मंदीरात अभिषेक केला.श्री.राणे यांना दिर्घ आयुष्य लाभावे असे साकडे देवाकडे घातले.

यावेळी नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, रविंद्र रावराणे,रोहन रावराणे,विवेक रावराणे, रणजित तावडे, सुभाष रावराणे,गणेश मोहीते,रमेश शेळके,आशिष रावराणे अक्षय मोहीते, शिवाजी राणे, सुनील रावराणे यासह अन्य मंडळी उपस्थित होती.