
वैभववाडी : माजी नगराध्यक्षा नेहा माईणकर आयोजित मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबीराचे नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.तालुक्यातील नागरिकांच्या नेत्र तपासणीला प्रारंभ करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेंचा आज वाढदिवस आहे.यानिमित्ताने माजी नगराध्यक्षा नेहा माईणकर यांनी मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबीराचे आयोजन भाजपा कार्यालयात केले आहे.याच उद्घाटन कार्यक्रम पार पडला.यावेळी तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, माजी तालुकाध्यक्ष नासीर काझी,प्राची तावडे, दिगंबर मांजरेकर,नेहा माईणकर,संजय सावंत, राजेंद्र राणे, सुभाष रावराणे,रणजित तावडे,सानिका रावराणे,देवानंद पालांडे, सुनिल रावराणे,रामदास पावसकर,महेश चव्हाण,दिपक माईणकर यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.