वैभववाडीत १८ ला अनुसूचित जातीतील सुशिक्षित बेरोजगारांसाठी स्वयंरोजगार मेळावा

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 15, 2025 19:27 PM
views 81  views

वैभववाडी : जिल्हा उद्योग केंद्र,सिंधुदुर्ग व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार  युवक युवतींसाठी १८जुन रोजी एकदिवसीय मोफत रोजगार मेळावा वैभववाडी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे दुपारी २वा आयोजित करण्यात आला आहे.इच्छुकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

या मेळाव्यात मेळाव्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत कर्ज व सबसिडी योजना, नियोजित मोफत प्रशिक्षण  आदी बाबत  मार्गदर्शन केले जाणार आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार हा १८ते ५०वर्षे वयोगटातील व किमान सातवी पास असणे आवश्यक आहे.या मेळाव्याच्या अधिक माहितीसाठी युवा उद्योजक विशाल जाधव ,सुषमा साखरे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.