
वैभववाडी: शहरातील प्रभाग क्रमांक १३मध्ये ६बंद घरे चोरट्यांनी फोडली.यात सुमारे ८ते १०लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक वैभववाडीत दाखल झाले.सोबत श्वान पथक ही घटनास्थळी पोहचले आहे.या पथकात पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील,राजू जामसंडेकर,आशिष जामदार हे आहेत. चोरी झालेल्या ठिकाणी या पथकाकडून पाहणी सुरू आहे.