वैभववाडी : वैभववाडी प्रभागस्तरीय शालेय बाल कला-क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाला उद्या (ता. २३)पासून एडगाव येथे प्रारंभ होणार आहे.येथील श्री. रामेश्वर विद्यामंदिर एडगांव नं. १ येथे सकाळी ९वा. महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
वैभववाडी प्रभागस्तरीय शालेय बाल कला-क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे संचालक प्रमोद रावराणे, सरपंच रविना तांबे, रवळनाथ विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष सुनील रावराणे, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष बळीराम रावराणे, उपसरपंच प्रज्ञा रावराणे, एडगाव नं. १ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रताप रावराणे उपस्थित राहणार आहेत. सोमवारी(ता.२३) सकाळी ९.३० वा. दीप प्रज्वलन व उदघाटन, त्यानंतर लहान गट व मोठा गटाच्या मैदानी क्रीडा स्पर्धा, मंगळवारी (ता.२४) सकाळी ९.३० वा. लहान गट व मोठ्या गटाच्या 'ज्ञानी मी होणार' स्पर्धा, सकाळी ११.०० वा. समूहगान व समूहनृत्य स्पर्धा होतील. दुपारी ३.०० वा. बाल कला-क्रीडा महोत्सवाचा बक्षीस समारंभ व समारोप केला जाणार आहे. वैभववाडी प्रभागस्तरीय बाल कला-क्रीडा महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.