उद्या वैभववाडी तालुका खरेदी - विक्री संघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड

निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: November 09, 2022 20:08 PM
views 250  views

वैभववाडी : तालुका खरेदी - विक्री संघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड गुरुवार दि. १० नोव्हेंबर रोजी होणार आहेत. संघाच्या संचालक मंडळाची निवड बिनविरोध झाली होती. त्याचप्रमाणे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे.

तालुका खरेदी - विक्री संघाच्या गुरुवारच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. सहकार क्षेत्रातील तालुक्यातील महत्त्वाची असणा-या  संस्थेच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे.  संघाचे १५ संचालक बिनविरोध निवडून आले होते. आता गुरुवारी होणाऱ्या संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडी आहेत. अध्यक्ष पदासाठी प्रमोद रावराणे, महेश रावराणे, दिगंबर पाटील, सीमा नानिवडेकर यांची नावे चर्चेत आहेत. संघाची संचालक मंडळाची निवड सर्वपक्षीय नेते मंडळीनी एकत्र येत बिनविरोध केली होती. पक्षीय भेद बाजूला ठेवून ही निवड बिनविरोध झाली होती. त्याचप्रमाणे आता अध्यक्ष,  उपाध्यक्ष निवडी देखील बिनविरोध होण्याची शक्यता अधिक आहे. 

गुरुवारी शहरातील राजापूर अर्बन बँकेच्या दुसऱ्या मजल्यावर निवडी संदर्भात सकाळी अकरा वाजता बैठक होणार आहे. यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची निवड केली जाणार आहे.