वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाचे पुरस्कार जाहीर | यावर्षी सात जणांची पुरस्कारासाठी निवड

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 26, 2023 19:36 PM
views 685  views

वैभववाडी : तालुका खरेदी विक्री संघाच्यावतीने देण्यात येणारे पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. शेती क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या सात जणांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.संघाचे अध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी हे जाहीर केले.या पुरस्कारांचे वितरण ३० सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत करण्यात येणार आहे.दरम्यान संघाने यावर्षी खतविक्री,भातखरेदी आणि इतर खरेदीविक्रीतुन २ कोटी ९६ लाख ७७ हजार ९६३ रूपयांची केल्याची माहीती श्री.रावराणे यांनी येथे दिली.

येथील तालुका खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात पत्रकार परिषद झाली.यावेळी त्यांच्यासोबत उपाध्यक्ष अंबाजी हुंबे,संचालक सीमा नानीवडेकर,रवींद्र पवार,महेश रावराणे,उज्वल नारकर,आदी उपस्थित होते.

श्री.रावराणे यांनी संघाच्यावतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कार जाहीर केले.यावर्षी उत्कृष्ट भात उत्पादक शेतकरी-सुभाष काशिराम राणे-सडुरे,काजु उत्पादक शेतकरी मनोहर शिवराम फोंडके,हेत,ऊस उत्पादक शेतकरी-पुंडलिंक सहदेव साळुंखे,प्रयोगशील शेतकरी मंगेश परशुराम कदम,खांबाळे,उत्कृष्ट पशुपालक शेतकरी संतोष गोविंद ईस्वलकर,कोकिसरे,भरडधान्य महादेव सुर्याजी वाडेकर,नानीवडे यांची पुरस्कार समितीने निवड केली असुन या पुरस्कारांचे वितरण ३० सप्टेंबरला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत करण्यात येणार आहे.रोख रक्कम, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे असं श्री.रावराणे यांनी सांगितले.

श्री. रावराणे यांनी यावेळी संघाच्या आर्थीक उलाढालाची माहीती दिली.यावर्षी संघाने २ कोटी ९६ लाख ७७ हजार ९६३ रूपयांची उलाढाल केली.यामध्ये रासायनिक खतविक्रीतुन १ कोटी ३४ लाख ७३ हजार ५०९,भात बियाणे विक्री-७ लाख ९ हजार ५४०,सेंद्रीय खते विक्री-१२ लाख ५ हजार ३०९,किटकनाशके विक्री १ लाख ७७ हजार २०५,शेती अवजारे ८० हजार ५० ,पशुपक्षी खाद्य ९ लाख ५ हजार ९५०,भातखरेदी- १ कोटी ३१ लाख २६ हजार ४००, आदी उलाढालीचा समावेश आहे.संस्थेला निव्वळ नफा,२ लाख ७५ हजार ६५७ रूपये इतका मिळाला आहे.

तसेच येत्या आर्थीक वर्षात एक हजार सभासद करण्याचे उद्दिष्ट असुन पाच लाखांचे भागभाडवल उभे करण्याचा प्रयत्न आहे.संघाला आर्थीक दृष्टया सक्षम करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे असे मत देखील श्री.रावराणे यांनी व्यक्त केले.त्याचबरोबर यावर्षी काजू बी खरेदी करण्यासाठी संघ प्रयत्नशील आहे असे श्री.रावराणे यांनी सांगितले.