वैभववाडी : वैभववाडी पोलिस ठाणे व अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी प्रशालेच्या रस्ता सुरक्षा व नागरी संरक्षण विभागाच्यावतीने आज (ता.२जाने) सुमित्रा मंगल कार्यालयात रायझिंग डे साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना विविध शस्त्रे त्यांचे प्रकार, कार्य त्यांचा वापर याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल यांनी मार्गदर्शन केले.
पोलीस स्थापना दिन वैभववाडी पोलीसांनी येथील अर्जुन रावराणे विद्यालयातील विद्यार्थ्यासमवेत साजरा केला.यावेळी विद्यार्थ्यांना सायबर क्राईम, वाहतूक सुरक्षा याबाबत वाहतूक पोलीस कृष्णात पडवळ यांनी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना शस्त्र हाताळणे बाबत प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. विद्यार्थ्यांनी देखील शस्त्रे हातळणीचा अनुभव घेतला.
यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, संचालक शरद नारकर, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष तेजस आंबेकर, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, उपनिरीक्षक किरण घाग, पोलीस जितेंद्र कोलते प्रशालेचे आर.एस.पी. अधिकारी एम.एस.चोरगे, एस.एस.पाटील., एन.सी.सी. ऑफिसर एस.टी.तुळसणकर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.