वैभववाडी नगरी राममय | आ. नितेश राणेंनी घेतले श्रीरामांच दर्शन

Edited by:
Published on: January 22, 2024 08:49 AM
views 324  views

वैभववाडी : अयोध्येत रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने वैभववाडी तालुक्यात सर्वत्र धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व गावातील मंदिरामध्ये विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत. शहरातील दत्तमंदिरातही रविवार (ता. २१) पासून विविध कार्यक्रम सुरू आहेत. आज सकाळी या मंदिरात श्रीरामाचे विधीवत पूजा करण्यात आली. तसेच पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. या उत्सवाला आमदार नितेश राणे यांनी उपस्थित राहत श्रीरामाचे दर्शन घेतले.