
वैभववाडी : करुळ घाटात आज सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान दरड कोसळली. यामुळे तळेरे - गगनबावडा मार्गावरील वाहतूक पुर्णतः ठप्प झाली आहे. ही वाहतूक भुईबावडा घाटमार्गे वळविण्यात आली आहे. दरडीसोबत दगड व मातीचा मोठा ढीग रस्त्यावर आल्याने वाहतूक बंद झाली आहे. दरड हटविण्याचे काम सुरू असून सायंकाळी ४ वाजेपर्यंत मार्ग खुला होण्याची शक्यता आहे.