
वैभववाडी : महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी संघटना सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान निवृत्ती वेतानाबातच्या विविध समस्यांची चर्चा झाली. या भेटीदरम्यान वैभववाडी तालुक्यातील सेवानिवृत्तीधारकांकडून अंशराशीकरणाचा लाभ देण्यापुर्वीच त्याची वसुली केली जात आहे. ती तात्काळ थांबविण्यात यावी, ८० वर्षावरील सेवानिवृत्तधारकांना विना प्रस्ताव शासन परिपत्रकानुसार निवृत्तीवेतन अदा करण्यात यावे अशा दोन मागण्या करण्यात आल्या. या दोन्ही मागण्या मान्य करण्यात आल्या. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचीही भेट घेण्यात आली. यावेळी जिल्हा अध्यक्ष शरद नारकर, सरचिटणीस नितीन जठार, उपाध्यक्ष प्रकाश साळुंखे,सुहास रावराणे आदी उपस्थित होते.