
वैभववाडी : करुळ घाटात रविवारी रात्री दरड कोसळल्याने या मार्गावर ऐकेरी वाहतूक सुरू होती. ही दरड हटवून मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला आहे अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
गगनबावड्यापासून ३किमी अंतरावर घाटात रविवारी दरड कोसळली होती. दरडीसोबत मोठं दगड रस्त्यावर आल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. त्यानंतर रात्री काही दगड बाजूला करून येथून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती. आज सकाळपासून दरडीचा उर्वरित भाग बाजूला करण्याचं काम सुरू होते. सायंकाळी ४.३० वाजता संपूर्ण दरड हटविण्यात आली. सध्या या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.