
वैभववाडी : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी तालुका शिवसेनेच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन शिवसेना नेते अतुल रावराणे यांच्या हस्ते झाले.
श्री ठाकरे यांचा वाढदिवस आज राज्यभर विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जात आहे.वैभववाडी तालुक्यातील शिवसेना शाखेच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.येथील ग्रामीण रुग्णालयात हे शिबीर आयोजित केले होते.तालुक्यातील तरुणांनी रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केले.यावेळी तालुका प्रमुख मंगेश लोके, उपजिल्हा प्रमुख नंदु शिंदे, माजी सभापती लक्ष्मण रावराणे,तिरवडे सरपंच जितेंद्र तळेकर, उपतालुकाप्रमुख संतोष पाटील,गुलजार काझी, सुर्यकांत परब,राजेश तावडे,दिपक पवार, नितेश शेलार यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.