
वैभववाडी : गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा सोलापूर येथील टेम्पो वैभववाडी पोलीसांनी पकडला.५लाख ४हजार रुपयांच्या दारुसह १३लाखांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला असून सोलापूर येथील दोघांना नोटीस देऊन सोडण्यात आले.ही कारवाई शनिवारी रात्री १०.१०च्या दरम्यान कुसुर पिंपळवाडी फाट्यावर करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर , सहाय्यक उपनिरीक्षक राजन पाटील ,पो.ना. उद्धव साबळे, पो.कॉ. अजय बिल्पे ,हरीश जायभाय ,किरण मेथे ,योगिता जाधव,संतोष माने , रघुनाथ जांभळे या पोलीस पथकाने केली.