
वैभववाडी : रोटरी क्लब ऑफ वैभववाडीच्या अध्यक्षपदी सचिन रावराणे,सचिव नामदेव गवळी व खजिनदार स्नेहल रावराणे यांची निवड करण्यात आली आहे.हा नुतन पदग्रहण सोहळा उद्या ता १३ जुलै येथील हॉटेल महालक्ष्मी सभागृहात सायंकाळी ७ वाजता पार पडणार आहे.
नवीन पदाधिकाऱ्यांना पदभार रोटे. विक्रांतसिंह कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. याप्रसंगी जिल्ह्यातील विविध रोटरी क्लब्सचे पदाधिकारी, सदस्य आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात "आदर्श ग्रामविकास अधिकारी" म्हणून गजानन कोलते यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या निहाल प्रकाश रावराणे आणि आर्य दीपक मोरे या दोन गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव केला जाणार आहे, अशी माहिती अध्यक्ष प्रशांत गुळेकर यांनी दिली.