
वैभववाडी : वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या अर्जुन रावराणे विद्यालय, श्री.जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ सोहळा उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रमाने सा-यांनाच आकर्षित केले.
रावराणे शिक्षण संकुलाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या सुरुवातीला देशाचे माजी पंतप्रधान अर्थतज्ज्ञ डॉ.मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष सदानंद रावराणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. यानंतर दहावी - बारावी बोर्ड परिक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना, स्नेहसंमेलन निमित्ताने आयोजित वेशभुषा स्पर्धा, वर्ग सजावट स्पर्धा यांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना तसेच सन २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य व प्रशंसनीय जनसेवा केल्याबद्दल कलाशिक्षक मंदार चोरगे, प्रकाश पाटील, विजय मरळकर, शिक्षिका संगिता पाटील उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी म्हणून कार्याबद्दल लिपिक प्रतिभा कोकरे यांच्यासह उत्कृष्ट कामगिरी बद्दल शिक्षक संदिप शिंदे, सायली सबनिस, योगेंद्र चव्हाण, यांना देखील सन्मानपत्र शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन संस्था पदाधिकाऱ्यांच्यावतीने गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव अर्जुन रावराणे,विक्रम रावराणे, अरविंद रावराणे, सत्यवान रावराणे, विजय रावराणे, शरद नारकर आदी संचालक, गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, डॉ.पाटील, आनंदीबाई रावराणे कॉलेज चे प्रभारी प्राचार्य नामदेव गवळी, वाभवे वैभववाडी नगरपंचायतचे विद्यमान शिक्षण आरोग्य व क्रीडा सभापती रोहन रावराणे, बांधकाम सभापती रणजीत तावडे, नगरसेविका श्रद्धा रावराणे, वैभववाडी माजी सभापती मिनाताई बोडके, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष तेजस आंबेकर, गंगाधर केळकर, कोल्हापूरचे उद्योजक सयाजी पाटील,बाळा कदम आदी उपस्थित होते.यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी लिहलेले लेख, कविता, चित्रे यांचे एकत्रित संकलन असलेल्या 'अक्षरगंध' या हस्तलिखिताचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेच्या माध्यमातून पंचक्रोशीतील हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात अग्रेसर भुमिका बजावतात असल्याबद्दल कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांना देखील सत्कार संस्था अध्यक्ष व सर्व संचालक मंडळाच्या वतीने यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बी.एस.नादकर, सुत्रसंचलन व्हि. एस. मरळकर, एन.व्ही प्रभू, पी.पी सावंत, एस .ए. सबनिस, एस.व्ही भोसले, यांनी केले. स्नेहसंमेलन प्रमुख म्हणून ए.जी.केळकर यांनी काम पाहिले. विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार , अनेक नृत्य, नाट्य संगीत कार्यक्रम सादर केले.