कुडाळ ग्रामीण रुग्णालयातील महाआरोग्य शिबिराला वैभव नाईक यांनी दिली भेट

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 14, 2023 20:26 PM
views 179  views

कुडाळ : आयुष्यमान भव योजनेअंतर्गत आज कुडाळ ग्रामीण रुग्णालयात महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन शिबिराचा आढावा घेतला. कुडाळ ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्राची तनपुरे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करत शिबिराची माहिती दिली. आ. वैभव नाईक यांनी देखील या शिबिरात स्वतःची  तपासणी करून घेतली.सुमारे २५० नागरीकांनी याचा लाभ घेतला. या योजनेअंतर्गत नवजात बालकापासून वयोवृद्ध अशा सर्व पुरुष व महिला नागरिकांच्या आरोग्याची संपूर्ण तपासणी  तज्ञ डॉक्टरांकडून करून निदान व उपचार करण्यात आले. 

यावेळी कुडाळ ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्राची तनपुरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. फड ,डॉ. करंबळेकर, डॉ. निगुडकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर, राजू गवंडे,मंजू  फडके, स्टाफ नर्स -कुडास्कर, ठाकूर, कडुळकर, तेली, धुरी आदी उपस्थित होते.