
मालवण : मालवणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शहरात प्रत्येक प्रभागात घरोघर प्रचार सुरु आहे. माजी आमदार वैभव नाईक हे मालवणात ठाण मांडून आहेत. मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत.
मालवण नगरपरिषद निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आहे. शिवसेना उबाठा पक्षाकडून झंझावती प्रचार सुरु आहे. माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे शिवसेनेचा प्रचार सुरु आहे. नगराध्यक्ष पदासाठी पूजा करलकर या निवडणूक रिंगणात आहेत. नगरसेवक पदाचा अनुभवी चेहरा घेऊन ठाकरे शिवसेनेने प्रचारात रंगत आणली आहे. स्वतः वैभव नाईक प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांच्या भेटी घेत आहेत.










