वैभव नाईक मॅरेथॉन फेरीत धावले !

शिवजयंतीनिमित्त सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजचं आयोजन
Edited by: उमेश बुचडे
Published on: February 18, 2024 09:54 AM
views 1427  views

सिंधुदुर्गनगरी :  शिवजयंती निमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आज रविवारी सकाळी सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजच्या वतीने देखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच उपजिल्हा रुग्णालय ते ओरस छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्यापर्यंत पर्यंत मॅरेथॉन फेरी आयोजित करण्यात आली होती.


याचे उद्घाटन आ वैभव नाईक यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. आ. नाईक यांना एक्सरसाइजची आवड असल्याने त्यांनी देखील या मॅरेथॉन फेरीमध्ये धावत सहभाग घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्स्फूर्तता पाहायला मिळाली. यावेळी बहुसंख्येने जिल्हा रुग्णालयातील मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे म्हणजेच भावी डॉक्टरांचा मोठ्या संख्येने सहभाग पाहायला मिळाला.