मोरयाचा धोंडा हायमास्ट टॉवरचे वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजन !

आमदार स्थानिक विकास निधीअंतर्गत ५ लाख मंजूर
Edited by: उमेश बुचडे
Published on: March 11, 2024 10:24 AM
views 92  views

मालवण : मालवण शहराला ऐतिहासिक वारसा आणि परंपरा असलेल्या मोरयाचा धोंडा येथे हायमास्ट टॉवरसाठी आमदार वैभव नाईक यांनी आपल्या आमदार फंडातून  ५ लाख रुपये निधी मंजूर केला आहे. या कामाचे भूमिपूजन आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या दिमाखात करण्यात आले.

या आधी आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग किल्ला येथील शिवराजेश्वर मंदिर नुतनीकरणासाठी, महाराजांच्या सिंहासनासाठी भरीव असा निधी दिला होता. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने आमदार वैभव नाईक यांचे आभार मानण्यात आले. या कामाला प्रत्यक्ष सुरुवात देखील करण्यात आली आहे. यावेळी आमदार वैभव यांनी आपण दाखवलेला विश्वास कधीही पायदळी जावू देणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज पावन झालेल्या भूमीत या मतदार संघाचा आमदार म्हणून काम करत आहे हे आपल्यासाठी अभिमानास्पद असून जे काही करता येईल ते यापुढील काळात करत राहू असा विश्वास व्यक्त केला.

        यावेळी  शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर,शहरप्रमुख बाबी जोगी,उपशहरप्रमुख राजू परब, तपस्वी मयेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, शाखाप्रमुख हेमंत मोंडकर, शाखाप्रमुख गणेश चव्हाण, महीला उपशहरप्रमुख अंजना सामंत, चंदू खोबरेकर, संतोष ढोके, दीपक ढोके, प्रकाश चांदेरकर, बबलू तारी, गणेश भगत, भक्ती तोडणकर, दाजी जोशी आदी शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.