
कुडाळ: कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी काल, लक्ष्मीपूजनाच्या मंगलमय दिनानिमित्त कुडाळ शहरात विविध ठिकाणी भेट देऊन दर्शन घेतले आणि नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जनतेला दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
दिवाळीच्या उत्साही वातावरणात वैभव नाईक यांनी कुडाळमधील नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या आनंदात सहभागी झाले. यावेळी त्यांच्यासोबत युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी, शहर निरीक्षक सुशील चिंदरकर, युवासेना उपतालुकाप्रमुख स्वप्नील शिंदे, सागर भोगटे, गुरु गडकर, अमित राणे, विनय पालकर, संतोष अडूळकर, नितीन सावंत, दीपक सावंत, रमेश हरमलकर, विनोद शिरसाट, धीरेंद्र चव्हाण आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी आमदार वैभव नाईक यांच्या या भेटीमुळे लक्ष्मीपूजन आणि दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचा उपक्रम उत्साहाचे वातावरण निर्माण करणारा ठरला. नागरिकांनीही त्यांचे स्वागत करत दिवाळीच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली.