
सावंतवाडी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार वैभव नाईक यांनी निलेश राणे यांना आगामी 2024 च्या विधानसभेत आपल्या विरुद्ध निवडणूक लढवूनच दाखवावी असे आव्हान दिले होते. यानंतर पुन्हा एकदा सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण तापलेल असतानाच भाजप जिल्हा प्रवक्ते तथा कुडाळ-मालवण मतदारसंघाचे निरीक्षक संजू परब यांनी आमदार वैभव नाईकांना प्रतिआव्हान दिल आहे.
संजू परब म्हणाले, आमदार वैभव नाईक तुमच्यात हिंमत असेल तर दोन दिवसांत आमदारकीचा राजीनामा द्या, अन् निवडणुकीला सामोरे जा असं प्रतिआव्हान देत दुध का दुध अन् पानी का पानी होऊन जाऊदेत असा इशारा संजू परब यांनी वैभव नाईकांना दिला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत राणेंना सामोरं जाण्याचं आव्हान देणारे वैभव नाईक भाजप प्रवक्ते संजू परब यांच हे आव्हान स्वीकारणार का ? संजू परब यांच्या प्रतिआव्हानावर वैभव नाईक किंवा त्यांचे समर्थक कोणती प्रतिक्रिया देणार याकडे राजकीय वर्तुळाच लक्ष लागून राहिले आहे.