आरोंद्यातील निवासस्थानी विराजमान गणरायाचे वैभव नाईकांनी घेतलं दर्शन

Edited by: विनायक गांवस
Published on: September 08, 2024 09:10 AM
views 289  views

सावंतवाडी : आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाचे आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबियांसोबत  दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. 


कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. यावेळी आमदार वैभव नाईक, सौ. स्नेहा नाईक, राजवर्धन नाईक, नंदिनी नाईक, सतीश नाईक, सुशांत नाईक, संकेत नाईक यांच्यासहित परिवारातील सर्वांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणरायाची विधिवत पूजा करून दर्शन घेतले. यावेळी नाईक कुटुंबियांकडून सर्व गणेशभक्तांना सदृढ आरोग्य, व सुख समाधान प्राप्त होण्यासाठी गणरायाकडे साकडे घातले.