वैभव नाईक सपशेल फेल गेले : निलेश राणे

Edited by: भरत केसरकर
Published on: July 29, 2023 14:46 PM
views 1220  views

कुडाळ : आमच्या कामाला स्टिकर लावण्यापलीकडे आमदार वैभव नाईकांना आता काम राहिलेले नाही. आमदार वैभव नाईक हे सपशेल फेल गेलेले आहेत.ते  ढेपाळलेले आमदार आहेत. उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केल्यानंतर त्यांना मतदार संघात पाहणी  करायला वेळ मिळतो  यावरून त्यांची मतदारसंघाबाबत असलेली मानसिकता दिसून येते. आम्ही केलेल्या कामाच श्रेय घेण्या पलीकडे कामच आमदारांना राहिले नाही, अशी टीका भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे.

कुडाळ येथील महिला व बाल रूग्णालयास भेट देवून ५० खुर्च्या मोफत स्वरूपात माजी खासदार निलेश राणे माजी यांनी स्वखर्चातून दिल्या. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर निलेश राणे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी निलेश राणेनी आमदार वैभव नाईक यांच्यावर जोरदार टिका केली.