वैभव नाईकांची सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुखपदी निवड

दोडामार्गात होणार भव्य स्वागत
Edited by: लवू परब
Published on: April 29, 2026 13:23 PM
views 37  views

दोडामार्ग :  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल माजी आमदार वैभव नाईक यांचे गुरुवार 30 एप्रिल रोजी दोडामार्गत भव्य स्वागत करण्यात येणार आहे.    

गुरुवार दि. 30 रोजी सकाळी 10.30 आगमन दोडामार्ग बाजारपेठेत मुख्य चौकात स्वागत करण्यात येणार आहे. 11. वा शिवसेना तालुका संपर्क कार्यालयात सत्कार सोहळा पार पडणार आहे. तसेच कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी होणार आहेत. यावेळी माजी जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ आदी उपस्थित राहणार आहे.

त्याच्या निवडीमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तालुका प्रमुख संजय गवस यांनी तालुक्यातील महिला व युवा, सरपंच उपसरपंच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन केले आहे.