त्रिंबक घाडीगावकरवाडीतील गोंधळ उत्सवाला वैभव नाईकांची भेट

Edited by:
Published on: January 09, 2025 17:37 PM
views 132  views

मालवण :  त्रिंबक घाडीगावकरवाडी येथील श्री भवानी देवीच्या त्रैवार्षिक गोंधळ उत्सवाला माजी आमदार वैभव नाईक यांनी काल भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी घाडीगावकरवाडी उत्सव समितीच्या वतीने वैभव नाईक यांचे स्वागत करून, सत्कार करण्यात आला.

मुंबई तसेच विविध भागात असलेला  घाडीगावकर परिवार गोंधळ उत्सवाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने आपल्या गावी उपस्थित राहून  मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा करीत आहे. रूढी परंपरा जोपासण्याचे काम यामाध्यमातून होत आहे. त्याचबरोबर नवीन पिढीला धार्मिक कार्याची ओढ लावली जात आहे. हे कौतुकास्पद असल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले. 

यावेळी शिवसेना आचरा विभागप्रमुख समीर लब्दे, विभाग संघटक, आचरा माजी सरपंच जिजा टेमकर, विनायक परब, अनिल गावकर, माणिक राणे, रंजन प्रभू, चंद्रकांत परब, संतोष घाडीगावकर, संतोष गोरुले, सागर चव्हाण, दाजी भाटकर, हरी साटम, श्री. राणे व घाडीगावकर परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.