भविष्याचा वेध घेऊन स्पर्धेत उतरा : वैभव नाईक

सह्याद्री माध्य. विद्यालय भडगाव बु. चे स्नेहसंमेलन उत्साहात
Edited by: कुडाळ प्रतिनिधी
Published on: January 04, 2025 14:36 PM
views 208  views

कुडाळ : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही जगाच्या पाठीवर आपली छाप उमटवली आहे. सह्याद्री माध्यमिक विद्यालयातून शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. या विद्यालयातून ज्ञानार्जनाचे कार्य उत्तम प्रकारे होत आहे.आता प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली असल्याने विद्यार्थ्यांनी भविष्याचा वेध घेऊन स्पर्धेत उतरले पाहिजे. त्यासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य आम्ही करू अशी ग्वाही माजी आमदार वैभव नाईक यांनी  दिली. 

कडावल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सह्याद्री माध्यमिक विद्यालय भडगाव बु. या विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन समारंभ शुक्रवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष जनार्दन चव्हाण तर माजी आमदार वैभव नाईक यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच सायंकाळी विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडले. 

यावेळी संस्थाध्यक्ष चंद्रशेखर सावंत, संस्था सचिव संभाजी वळंजू, मुख्याध्यापक सचिन धुरी, संदीप सावंत, चंद्रहास सावंत, वर्दे सरपंच महादेव पालव, लालू सावंत, अतुल कल्याणकर, अरुण माळकर, विद्याधर मुंज, अमित कल्याणकर, किरण गावकर, सहाय्यक शिक्षक सतीश वारंग, रामचंद्र पिकुळकर, माधुरी खराडे, सुप्रिया बांदेकर, आदिती परब, कविता राऊत, राजेंद्र सावंत, लक्ष्मण बावदाने, लक्ष्मण लोट, भार्गव सावंत, रेणुका खरात, आर्या कल्याणकर यांसह संस्थेचे पदाधिकारी, पांग्रड शाळेचे मुख्याध्यापक, भडगाव बु. विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद व विद्यार्थी, पालक उपस्थित होते.