भाजपचे माजी उपसरपंच अरविंद सावंत ठाकरे गटात

वैभव नाईकांचा धक्का
Edited by: देवयानी वरसकर
Published on: November 01, 2024 12:57 PM
views 199  views

कुडाळ : कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कुडाळ तालुक्यातील वर्दे गावचे भाजपचे माजी उपसरपंच अरविंद सावंत यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसह आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे. गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही भाजप कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला अशी माहिती या वेळी पक्ष प्रवेशकर्त्यांनी दिली आहे.

        यावेळी वर्दे माजी उपसरपंच अरविंद सावंत म्हणाले की आ.वैभव नाईक यांनी विविध योजनांमधून लाखो रुपयांचा विकास निधी देऊन या भागातील ग्रामस्थांची विकासकामे मार्गी लावली आहेत,असे सांगत यापुढील काळातही ते वर्दे गावातील विकासकामांना प्राधान्य देतील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

    यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले की माझ्यावर व माझ्या पक्षावर जो विश्वास भाजप प्रवेशकर्त्यांनी दाखवला.त्याबद्दल विशेष ऋण व्यक्त करत गावचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वासही आमदार वैभव नाईक यांनी वर्दे येथील प्रवेशकर्त्यांनी दिला आहे.

    यावेळी रमन सावंत, साईप्रसाद सावंत,शंकर कुंभार या भाजपच्या प्रमुख प्रवेशकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.      यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वेताळ बांबार्डे विभाग संघटक संदीप सावंत, युवासेना विभागप्रमुख, संतोष सावंत, वर्दे सरपंच पप्पू पालव, वर्दे सोसायटी चेअरमन बंडु सावंत, वर्दे ग्रामपंचायत सदस्य रूपेश सावंत आदि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.