वैभव नाईकांनी घेतलं ९०० पेक्षा जास्त घरगुती गणपतींचे दर्शन

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: September 19, 2024 06:21 AM
views 200  views

सिंधुदुर्गनगरी : दरवर्षी गणेश चतुर्थी हा सण आमदार वैभव नाईक सर्वसामान्य जनतेसोबत साजरा करतात. गणेशोत्सवातील ११  दिवसांत ते सर्वसामान्य नागरिकांच्या  घरगुती गणपतींचे दर्शन घेतात. यावर्षी देखील कुडाळ, मालवण व कणकवली तालुक्यातील विविध गावात आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन ९०० पेक्षा जास्त नागरिकांच्या घरी विराजमान झालेल्या गणपतींचे दर्शन घेतले. 

दरम्यान यावेळी अनेक नागरिकांनी  गणपती दर्शनासाठी त्यांना आग्रह केला होता. मात्र वेळेअभावी सर्वच ठिकाणी जाणे शकय झाले नसले तरी त्यांनी जास्तीत जास्त ठिकाणी भेट देऊन नागरिकांच्या उत्साहात सहभागी होऊन नागरिकांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला.  नागरिकांनीही आमदार वैभव नाईक यांचे आनंदाने स्वागत केले.