जनतेचा विश्वास सार्थकी ठरवेन : वैभव नाईक

15 व्या वर्षी वह्या वाटपात सातत्य
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 06, 2024 13:03 PM
views 177  views

कुडाळ : समाजकारणाचा वसा घेऊन शिवसेना पक्ष गेली ५८ वर्षे कार्यरत आहे. संकटाच्या काळात नेहमी शिवसैनिक मदत कार्यात पुढे असतात. केवळ राजकारण न करता समाजातील प्रत्येक घटकाला मदतकार्य करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवित आहोत. आम्ही राबवित असलेल्या उपक्रमात सातत्य राखले आहे. विद्यार्थ्यांना वह्या वाटप हा देखील त्यातीलच एक उपक्रम आहे. गेली १५ वर्षे वह्या वाटपाचा उपक्रम  राबविला आहे. त्याचबरोबर ना नफा ना तोटा तत्वावर स्वस्त दरात ताडपत्री वाटप करण्यात येते. आरोग्य तपासणी शिबीर, मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर राबवून गोरगरीब जनतेला त्रासमुक्त करण्यात आले. अशा उपक्रमातून जनतेने माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थकी ठरविण्याचा प्रयत्न मी करीत आहे असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले. 

आमदार वैभव नाईक व शिवसेना कुडाळ तालुक्याच्या वतीने कुडाळ तालुक्यात विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा शुभारंभ आज श्री. भगवती देवी माध्यमिक विद्यालय आंब्रड येथे पार पडला. यावेळी आंब्रड बाजारपेठ प्राथमिक शाळा,आंब्रड परबवाडा प्राथमिक शाळा, आंब्रड राऊळवाडा प्राथमिक शाळा, आंब्रड मोगरणे प्राथमिक शाळा या शाळॆतील विद्यार्थ्यांनाही वह्यांचे वाटप करण्यात आले.वह्या वाटपातून विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली. 

संस्था अध्यक्ष आबा मुंज, सरपंच मानसी कदम यांनी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून आंब्रड गावात अनेक विकास कामे झाल्याचे सांगितले. त्याबद्दल गावच्या वतीने त्यांचे आभार मानले.

यावेळी आ. वैभव नाईक यांच्या पत्नी स्नेहा नाईक, शिवसेना उपतालुका प्रमुख सचिन कदम, संस्था अध्यक्ष आबा मुंज,आंब्रड सरपंच मानसी कदम, चेअरमन विकास राऊळ, दिनकर भाऊ परब, ग्रा. प. सदस्य सागर वाळके, संगीता मेस्त्री, आंब्रड विद्यालयाचे मुख्याध्यापक राठोड, आंब्रड बाजारपेठ शाळेचे मुख्याध्यापक गंगावणे, आंब्रड परबवाडा शाळेचे मुख्याध्यापक श्री सावंत, आंब्रड राऊळवाडा शाळेच्या मुख्याध्यापक चिंदरकर, आंब्रड मोगरणे शाळेचे मुख्याध्यापक सर्फे मॅडम, दशरथ मेस्त्री, पांडुरंग दळवी, सीताराम दळवी आदी उपस्थित होते.