जलवाहतुकीला मुदतवाढ देण्याची वैभव नाईकांची मागणी !

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: May 16, 2024 13:56 PM
views 157  views

मालवण : सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक, जलवाहतूक व साहसी जलक्रीडा प्रकारांना १० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी आमदार वैभव नाईक यांनी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे.

     दरवर्षी किल्ले प्रवासी वाहतूक व जलवाहतूक व सागरी साहसी क्रीडा २५ मे रोजी बंद करण्याच्या सुचना देण्यात येतात. गेल्या वर्षी मान्सुन १० जुन पर्यंत रखडल्याने २५ मे नंतर येणाऱ्या पर्यटकांचा हिरेमोड झाला होता. यावर्षी देखील हवामान खात्याने १२ जुनपर्यंत मान्सुन येणार नसल्याचे जाहिर केले आहे. तरी यावर्षीची किल्ले प्रवासी वाहतूक, जलवाहतूक व सागरी साहसी क्रीडा १० जुन २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, असे आमदार नाईक यांनी म्हटले आहे.