वेंगुर्ला तुळस काजरमळी मार्गे वडखोल बस फेरी सुरू ; ग्रामस्थांनी केले स्वागत

Edited by: दिपेश परब
Published on: August 07, 2023 15:25 PM
views 609  views

वेंगुर्ला : गेली ८ ते ९ वर्ष बंद असलेली वेंगुर्ला, तुळस- काजरमळी मार्गे वडखोल, कॅम्प वेंगुर्ला ही बस फेरी आज (७ ऑगस्ट) पासून पुन्हा सकाळ व संध्याकाळ अशी २ वेळा सुरू करण्यात आली आहे. यावेळी वडखोल ग्रामस्थांच्या वतीने एसटी ला सजवत, हार घालून व शिवसेना शहर प्रमुख उमेश येरम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्वागत करण्यात आले. 

शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर शहर प्रमुख उमेश येरम व शिवसेना पदाधिकारी तथा वडखोलचे रहिवासी प्रभाकर पडते यांच्या पाठपुराव्याने व अथक प्रयत्नातून ही बस फेरी सुरू करण्यात आली. ही बसफेरी सकाळी वेंगुर्ला येथून ९.१५ वाजता सुटणार आहे तर संध्याकाळी ४.४५ वाजता पुन्हा एक फेरी होणार आहे. यामुळे याचा मोठ्या प्रमाणात फायदा शालेय विद्यार्थ्यांना होणार आहे. वडखोल या भाग संपूर्ण डोंगर भागत असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडी वाढली होती. तसेच विद्युत तारा सुद्धा रस्त्यावर खुप खाली आल्याने ही बस फेरी बंद करण्यात आली होती. 

 दरम्यान या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर पडते  यांनी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर व शहर प्रमुख उमेश येरम यांच्या मदतीने एसटी महामंडळ, विद्युत वितरण व स्थानिक ग्रामस्थांकडे याबाबत गेले २ महिने पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला. याबाबत वडखोल ग्रामस्थांच्या वतीने प्रभाकर पडते यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, शहर प्रमुख उमेश येरम, तुळस सरपंच रश्मी परब, माजी जि.प. सदस्य मकरंद परब, माजी पं स सदस्य सुभाष परब, शिवसेना शहर उपाध्यक्ष राजू परब, महिला शहर संघटिका श्रद्धा बाविस्कर-परब, तुळस ग्रा प सदस्य मयुरी बरागडे, रुपेश कोचरेकर, मठ ग्रा प सदस्य संतोष वायंगणकर, सनी मोरे, ग्रामस्थ कृष्णा परब, उमेश परब, रमेश परब, मंगेश परब, गोपीचंद लरब, भाई पालव, श्याम केरकर, शरद परब, मदन धुरी, उत्तम परब, बाबाजी परब, तेजस निवजेकर, कांता पालयेकर, एकनाथ पालव, ग्रामस्थ कोठारी, आरमारकर, वायंगणकर, राणे , कोळेकर, बरागडे, वेंगुर्ला हायस्कूल मुख्याध्यापक पी. डी. कांबळी, एसटी आगर चे ठुंबरे, ग्रा प माजी सदस्य दिपलक्ष्मी परब, दशरथ परब आदी उपस्थित होते. यावेळी प्रस्तावना अनंत उर्फ अण्णा परब यांनी केली. 

दरम्यान या वडखोल रस्त्याला असलेल्या मोठ्या वळणावर संरक्षक कठाड्याला १० लाख चा निधी मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून लवकरात लवकर देण्यात येईल असे यावेळी सचिन वालावलकर यांनी सांगितले.