वाभवे - वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा पदासाठी श्रद्धा रावराणेंचा एकमेव अर्ज

Edited by:
Published on: February 17, 2025 18:15 PM
views 421  views

वैभववाडी : वाभवे -वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा पदासाठी निवडणूक जाहीर झाली आहे.याकरिता भाजपच्या श्रद्धा रावराणे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.केवळ एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला असल्याने रावराणे यांची निवड निश्चित मानली जात आहे.

नगरपंचायतीच्या विद्यमान नगराध्यक्षा नेहा माईणकर यांनी पक्ष धोरणानुसार काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.त्यानंतर या पदासाठी निवडणूक जाहीर झाली होती.त्यानुसार आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचे होते.त्यानंतर छाननी झाल्यानंतर २४फेब्रु.ला निवडणूक होणार आहे. सौ.रावराणे यांनी आज दुपारी नामनिर्देशन पत्र दाखल केले.सौ.रावराणे यांचा एकमेव अर्ज आला आहे.

त्यामुळे त्यांची निवड निश्चित मानली जात आहे.आता निवडीची केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, नगरसेवक प्रदीप रावराणे, सज्जन रावराणे, विवेक रावराणे,संतोष पवार,संजय चव्हाण,दिपक गजोबार यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.