
सावंतवाडी : व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी, माडखोल सावंतवाडी येथे तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्यातर्फे सुरु असलेली डी. फार्मसी प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या पूर्ण झालेल्या असून यानंतरच्या रिक्त राहिलेल्या व संस्थास्तरावर जागांसाठी प्रवेश देणे सुरु आहे. महाविद्यालयामध्ये २७ डिसेंबर २०२२ ते ३० डिसेंबर २०२२ या कालावधीत डी. फार्मसीसाठी विहित नियमानुसार प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसहित महाविद्यालयात उपस्थित राहून सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा.
केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (CAP ROUND) मध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी या अंतिम फेरीचा फायदा घेऊन आपला प्रवेश निश्चित करावा असे प्रशाकीय अधिकारी पंकज पाटील व प्राचार्य डॉ. शिंगाडे सर यांनी आवाहन केले आहे.