
सावंतवाडी : व्ही. एन. नाबर चा सलग १८ वर्षे १०० % निकाल लागला. दरवर्षी प्रमाणे यंदाही शाळेचा १०० % लागला असून कु. आर्या प्रशांत मुळीक 96.60%, कु. श्रीशा सखाराम सावंत 96.20% दुसरा क्रमांक, कु. अथर्व नारायण नेमळेकर 95.20%, कु. कृपा मुनेश वारंग 94.60% तिसरी. एकूण 32 विद्यार्थी या परीक्षेस प्रविष्ठ झाले होते त्यापैकी 90-100% 8 विद्यार्थी 80-90%18 विद्यार्थी 71- 80% 6 विद्यार्थी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन श्री मंगेश कामत, पी टी ए उपाध्यक्ष दौलतराव देसाई, मुख्याध्यापिका मनाली देसाई सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.