
कुडाळ : तालुक्यातील चेंदवण गावच्या माजी सरपंच आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या सदस्या सौ. उत्तरा धुरी यांनी आज भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी भालचंद्र धुरी, प्रमोद नाईक, धोंडी नाईक, उमेश नाईक, हनुमंत परब, भालचंद्र रेवणकर आणि प्रवीण भरडकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायणराव राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या कामामुळे प्रभावित होऊन आपण हा निर्णय घेतल्याचे उत्तरा धुरी यांनी सांगितले. लवकरच चेंदवण गावामध्ये एक मोठा मेळावा घेऊन आपल्या इतर सहकाऱ्यांचा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य सौ. संध्या तेरसे यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या सर्वांचे स्वागत केले. यावेळी बोलताना भाजपचे जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई यांनी, खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून चेंदवण गावासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन दिले.
या प्रवेश सोहळ्यावेळी मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, सरचिटणीस रुपेश कानडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य मोहन सावंत, पप्या तवटे, महिला मोर्चा अध्यक्ष सौ. आरती पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष तन्मय वालावलकर, सुनील बांदेकर, सचिन काळप, निलेश तेंडोलकर, सौ. विशाखा कुलकर्णी, सौ. तेजस्विनी वैद्य, सौ. अक्षता कुडाळकर, चेंदवणचे सरपंच वैभव चेंदवणकर, उपसरपंच ऋषिकेश माधव, नारायण शृंगारे, प्रशांत तेंडोलकर, सौ. प्रणाली तेंडोलकर, सूर्यकांत शृंगारे, गोपाळ कोचरेकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.